स्वेरीच्या डॉ. आर.एस. पवार यांच्या ‘घनकचरा व्यवस्थापन: नांदेड शहराचा अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन
या पुस्तकाचे नऊ भाषांत भाषांतर
R.S. Pawar's published book 'Solid Waste Management: Study of Nanded City' .
This book has been translated into nine languages.
पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील डॉ. रणजितसिंह सुभाष पवार यांच्या ‘घनकचरा व्यवस्थापन: नांदेड शहराचा अभ्यास’ या विषयावरील पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
अभियांत्रिकीचा विचार करता तंत्रज्ञान , अवजड मशिनरी, संशोधने या विविध विषयांवर पुस्तके लिहिली जातात, हा इतिहास आहे पण स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागात कार्यरत असलेल्या डॉ. रणजितसिंह सुभाष पवार यांनी एका ज्वलंत समस्येवर आधारित पुस्तक लेखन केलेले आहे. आज जगात स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन ही अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून याच विषयावर आधारित असलेले ‘घनकचरा व्यवस्थापन: नांदेड शहराचा अभ्यास’ या विषयावर परीक्षण व अभ्यास करून डॉ.पवार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. जर्मनीमधील लँबर्ट अकॅडेमीक पब्लिशिंग या पुरस्कार प्राप्त कंपनीच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. हे पुस्तक तब्बल नऊ देशांतील वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरीत करून त्यांच्या या पुस्तकाच्या वाचकांचा विस्तार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. आता लॅटिन अमेरिका, युरोप, रशिया, आशिया आणि इतरत्र असलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ भाषेत हे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली आहे. डॉ. पवार यांनी हे पुस्तक डॉ. दिपक पानसकर व डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीले असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुस्तकामुळे घनकचऱ्याच्या नियोजनासाठी योग्य दिशा मिळणार आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह स्वेरीचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्र. प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा